बीड-जिल्ह्यासह मराठवाड्यात कालपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील बसस्थानकाला तलावाचे स्वरुप आले आहे. आज (दि.१०) आषाढी एकादशी असल्याने भाविकांची बसस्थानकात मोठी गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या वतीने पेेंडॉल उभे केले खरे परंतु या पेंडॉलमध्ये पाणी घुसल्याने पाय ठेवायला जागा नाही.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली होती. मराठवाड्यातील जनता पावसाची आतुरतेने वाट पहात होती. कालपासून धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरी काही ठिकाणी त्रेधातिरपट उडत आहे. शहरातील बसस्थानकातील विकासाचे दारिद्रय अजूनही संपले नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. रात्रीच्या पावसाने अवघे बसस्थानक पाण्यात असल्यासारखे दिसून येत आहे. प्रवाशांना बसस्थानकात जाता-येत नाही. उद्या आषाढी एकादशी असल्याने बसस्थानकात वारकर्यांची मोठी गर्दी होईल. पाण्यामुळे वारकर्यांची गैरसोय होऊ शकते. एसटी महामंडळाने वारकर्यांसाठी पेंडॉल उभा केला असला तरी या पेंडॉलमध्ये सुद्धा पाणी जमा झालेले आहे. पेंडॉल परिसरात तरी महामंडळाने मुरुम टाकून सुविधा करायला हवी होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांसाठी चहापानी आणि नाश्त्याची सुविधा केली जाते. ज्याठिकाणी सुविधा करण्यात आली आहे त्याठिकाणी महामंडळाने काही उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी वारकरी सेवा मंडळाच्या वतीने केली जात आहे.
बातमी शेअर करा