परळी - गजानन महाराज यांची पालखी परळी शहरात दाखल होण्यापूर्वी दादाहरी वडगाव येथे जायकवाडी वसाहत येथे थांबली असता गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संत गजानन महाराजांची पालखी दादाहरी वडगाव जायकवाडी वसाहत येथे थांबली असता परिसरातील अनेकांनी दिंडीत दर्शनासाठी गर्दी केली. या मध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती याच गोष्टींचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा दिंडीत वळवून दिंडीत आलेल्या वासुदेव रामकिसन आघाव (वय 33 वर्षे) यांच्या पत्नीचे व गावातील अन्य महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे असा एकूण 46500 चा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 165/2022 कलम 379 भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि झांबरे हे करीत आहेत.