माजलगाव(प्रतिनिधी)- शुल्लक कारणावरुन एका शेतकर्यांवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार दि.22 रोजी माजलगांव तालुक्यातील पायथळवाडी येथील शेतात घडली. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या शेतकर्याने माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम श्रीमंत बाबरे वय-22 वर्ष रा. पायथळवाडी ता.माजलगांव यांना रामभाऊ सुंदरराव आगे वय-60 वर्षे रा.किटी आडगांव यांनी शुल्लक कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने कोयत्याने डोक्यावर, कपाळावर, डाव्या हातावर सपासप वार करुन गंभीर केले. या प्रकरणी माजलगांव ग्रामीण पोलीसात गुन्हा रजिस्टर नं.166/2022 कलम 307 नूसार रामभाऊ सुंदरराव आगे यांच्या विरोधात दाखल झाला आहे.
बातमी शेअर करा