Advertisement

पंकजा मुंडेंकडून तहाची भूमिका

प्रजापत्र | Tuesday, 21/06/2022
बातमी शेअर करा

बीड : भाजपने विधानपरिषदेवरील संधी नाकारल्यानंतर मौन पळून असलेल्या माजी मंत्री पकंजा मुंडे यांनी मंगळवारी मोहता देवीचे दर्शन घेतले. त्या आज मौन तोडतील अशी अपेक्षा असल्याने मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते पंकजा मुंडे काय सांगतात हे ऐकण्यासाठी जमले होते, या सर्व कार्यकर्त्यांसमोर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संयम आणि तहाची भाषा केली आहे. त्यामुळे आता पंकजा समर्थकांना आपल्या आक्रमकतेला थंड करावे लागणार आहे.
 माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मोहटा देवीचे दर्शन घेतले. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंचे समर्थक अस्वस्थ असून आज पंकजा मुंडे काही तरी भूमिका स्पष्ट करतील अशी समर्थकांना अपेक्षा असल्याने अनेक कार्तिकर्ते त्या ठिकाणी जमले होते. मात्र पंकजा मुंडेसारख्या दौऱ्याच्या अगोदरच राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तर पंकजच्या भूमिकेकडे जास्त लक्ष लागले होते.
मात्र पंकजांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयमाचे धडे दिले आहेत. 'माझा संयम लेचापेचा नाही.  जे हार मुंडे साहेबांच्या सत्कारासाठी आणले होते ते हार त्यांच्या अंत्यविधीला वापरले हे पाहणारी, पचवणारी आणि आक्रमक झालेल्या जनतेला शांत करणारे मी पंकजा मुंडे आहे.आता पंकजा मुंडे काय करणार? असा सर्वांना प्रश्न पडला,  मात्र कोणाला संधी मिळाल्याने त्याचा तिरस्कार करणे हे माझ्यावरचे संस्कार नाहीत ज्यांना मिळाले त्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद... पण मला एक या गोष्टीचं वाईट वाटतं की तुमची मनातली घालमेल असल्याने तुम्ही प्रत्येक जण मला फोन करत होता पण मी तुमची क्षमा मागते तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं तुमच्या सोबत मी कायम राहील असं त्या म्हणाल्या. त्यासोबतच 'निवडणूका येत असतात, जात असतात मात्र प्रेम करणाऱ्या लोकांची कधीही प्रतारणा केली नाही, त्यांच्या प्रेमाची उतराई होणे कधीही शक्य नाही.मी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले. सगळ्याच लढाया करून जिंकायचे नसते काही तह करायचे असतात. तह करणे म्हणजे पराजित होणं  नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या . त्यामुळे आता पंकजा समर्थकांना देखील आपल्या भावनांना आवार घालावा लागणार आहे

Advertisement

Advertisement