Advertisement

औरंगाबादेत भागवत कराडांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Sunday, 12/06/2022
बातमी शेअर करा

बीड-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होते. पण, त्यांना डावलण्यात आले. यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच नाराज झालेत. सकाळी बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविण्यात आला होता. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्यात आला आहे.
     विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. पंकजांच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच आज भागवत कराडांचा ताफा क्रांती चौकातील कार्यालयाकडे येत अडवण्याचा प्रयत्न केला.

 

कार्यकर्ते ताब्यात
भागवत कराड यांचा ताफा अडवणार असल्याची माहिती आधीच भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती, त्यामुळए तेदेखील तयारीत होते. यावेळी ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची पोलिसांनाही माहिती असल्याने, पोलिसांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 
 

Advertisement

Advertisement