Advertisement

कुमावतांच्या पथकाची मोठी कारवाई

प्रजापत्र | Sunday, 12/06/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१२ – एएसपी पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच असून गुन्हेगार सैरभैर झाले आहेत.त्यातच आणखी एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या मुक्या प्राण्यांची सुटका केली आहे.या कारवाईत पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
              अधिक माहिती अशी की, दिनांक 11 जून रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी  मिळाली की, जामखेड येथून आयशर टेम्पो क्रमांक MH 12 HD 0421 यामध्ये बेकायदेशीररित्या 18 जनावरे घेऊन जात आहेत. त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी मांजरसुम्बा मार्गे  मोमीनपुरा बीड येथे घेऊन जात आहेत. सदर माहिती मिळाल्यावरून कुमावत यांनी पथकातील पोलीस अंमलदार यांना दिल्याने पोलीस अंमलदार यांनी सदर चा आयशर टेम्पो क्रमांक MH 12HD 0421  दिनांक 11/06/ 2022  रोजी संध्याकाळी 7 वाजता मांजरसुंबा चौक हायवे पोलिस चौकीसमोर थांबून चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अरबाज शेख कट्टू, शहाबाज इजाज कुरेशी दोन्ही राहणार मोमीनपुरा बीड  असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना  विचारपूस करून कागदपत्रे विचारले असता व जनावराचे दाखले व जनावरे वाहतूक करण्याचा  परवाना ही जवळ नसल्याचे  सांगितले. त्यामुळे सदरची जनावरे बीड मोमीनपुरा येथील व्यापारी मोबीन कुरेशी यांची असून त्यांच्या सांगण्यावरून जामखेड येथून भरून मोमीनपुरा बीड येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनुर येथे घेऊन येऊन सदर टेम्पो तील जनावरे खाली उतरून मोजली असता दोन बैल व 11 गाई व पाच बारीक गोरे अशी एकूण 18 जनावरे ( 325 000 रुपयांचे) व टेम्पो  किंमत 450000 रुपये असा एकूण 775000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

Advertisement

Advertisement