Advertisement

भरधाव दुचाकीची बैलगाडीला धडक

प्रजापत्र | Saturday, 11/06/2022
बातमी शेअर करा

घाटनांदूर-उभ्या असलेल्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील दोघे जण  ठार झाले.  दोघे मयत लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील रहिवाशी आहेत.हा अपघात शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी सात वाजता अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर उजनीपाटी (ता.अंबाजोगाई) जवळ झाला.
      सुरेश नरहरी गायकवाड (वय ४५, रा.किनगाव) व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर (वय ३८, रा. किनगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धर्मापुरी येथील लग्न आटोपून ते दोघे सायंकाळी दुचाकीवरून (एमएच २४ एझेड ९७६१) किनगावकडे निघाले होते. सायंकाळी सात वाजता ते उजनीपाटी जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला  भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात मोटार सायकल चालक सुरेश गायकवाड व पाठीमागे बसलेले शेख जावेद शेख अल्लाबक्ष हे दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. दरम्यान अंबाजोगाई अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.

Advertisement

Advertisement