Advertisement

बार्शीनाका परिसरात पोहायला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

बीड। प्रतिनिधी
बीड शहरातील बार्शीनाका परिसरात असलेल्या एका जुन्या विहीरीवर पोहायला गेलेला पंधरा वर्षाचा मुलगा विहीरीच्या पाण्यात बुडाला असून सात परस पाणी असलेल्या या विहीरीत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आग्निशामक दलाकडे विहीरीतील पाणी उपसा करण्यातील यंत्रणा नसल्यामुळे शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे.

 

 

आर्यन भैय्या मारोती शिंदे (वय 15 रा.वडारवस्ती, बार्शीनाका, बीड) हा आपल्या चार मित्रांसोबत वडारवस्तीपासून जवळच असलेल्या प्रकाश आंबेडकर नगर परिसरातील जुन्या पाण्याचा उपसा होत नसलेल्या विहीरीत पोहायला गेला होता. आर्यन शिंदे याने विहीरीत उडी घेतल्यानंतर तो परत वर आला नाही त्यामुळे त्याच्यासोबत पोहण्यासाठी गेलेल्या त्याच्या तीन मित्रांनी वडारवस्तीवर जावून त्याच्या कुटूंबियांना आणि इतरांना या घटनेची माहिती दिली. कुटूंबातील लोक आणि इतर काही लोकांनी विहीरीकडे धाव घेतली. त्याच दरम्यान आग्निशामक दलाला या संदर्भातील माहिती देण्यात आली. विहीरीतील पाण्याचा उपसा होत नसल्याने काळ्याभोर पाण्यामध्ये चार ते पाच जणांनी उड्या घेवून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू पाणी घाण असल्याने तळापर्यंत बुडी मारणे शक्य होत नव्हते. आग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर त्यांचेही प्रयत्न सुरू असून आग्निशामक दलाकडे विहीरीतील पाणी उपसा करण्याची यंत्रणा नसल्यामुळे विहीरीतील पाणी काढता येत नाही. दरम्यान भैय्या शिंदे याच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 

Advertisement

Advertisement