माजलगाव दि.२३ (वार्ताहर)-सादोळा येथील उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे केसापुरी येथील हनुमान मंदिराच्या बाजूला पाईपलाईन च्या कामामुळे खड्डा खांदण्यात आला होता,यात पाणी साठल्याने त्यात पडून एक दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.
       दस्तगीर बिलाल शेख (वय-१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.शहरापासून जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ उपसा जलसिंचन योजनाचे काम सुरू आहे. लिकेज झाल्याने त्याठिकाणी खड्डा खंदण्यात आला होता,यात दस्तगीर बिलाल शेख याचा पाय घसरला,यावेळी खड्ड्यातील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
 
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
