अंबाजोगाई-:येथील क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवक पाण्यात बुडुन बेपत्ता झाला. ही दुर्घटना २० मे शुक्रवारी दुपारी दोन च्या दरम्यान घडली.अब्रार चांद शेख असे त्या युवकाचे नाव आहे.
अब्रार चांद शेख (वय-१७) हा युवक शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत क्रांतीनंतर परिसरातील खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. ही माहिती समजताच या परिसरात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संध्याकाळी या युवकाचे शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मात्र आपत्कालीन योजनेचे असलेले अपुरे साहित्य व अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. आता शनिवारी परळी येथील रेस्क्यू पथक शेधकामी मदत करणार आहे
बातमी शेअर करा