माजलगाव-शहरातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा रक्तस्राव न थांबल्याने मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी बाळाचाही मृत्यु झाला असून या घटनेनंतर चुकीची घटना घडू नये, यासाठी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
तालुक्यातील खेर्डा येथील सोनाली पवन गायकवाड (वय-२१) या महिलेचे दिवसभरत आल्याने रविवारी संध्याकाळी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या जाजु हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. महिलेला रात्रभर त्रास होत असल्याने तिच्या घरातील मंडळींनी डॉ. उर्मिला विजयकुमार जाजू व विजयकुमार जाजू यांना सिझर करा असे सांगितले. पण, डॉक्टरांनी त्यांचे न ऐकता सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नॉर्मल प्रसुती केली. यावेळी झालेल्या बाळाचे वजन देखील जास्त भरले होते.प्रसूती झाल्यानंतर महिलेचा रक्तस्राव न थांबल्याने महिला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दगावल्याची घटना घडली. त्यानंतर या महिलेचे नातेवाईक जमा झाले होते. या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराठे , पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.