Advertisement

टीव्ही-फ्रिज घेण्यासाठी मोजावे लागणार आता जास्तीचे पैसे

प्रजापत्र | Friday, 13/05/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - तुम्ही टीव्ही, वॉशिंग मशिन किंवा फ्रिज यांसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे काम लवकर पूर्ण करा. कारण होम अप्लायन्सेस आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या लवकरच त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवणार आहेत. अनेक कारणांमुळे त्यांच्या खर्चात वाढ झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे दर वाढविण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही.

 

 

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आणि चीनमधील शांघाईमध्ये लॉकडाऊनमुळेही कंपन्यांवर दबाव वाढला आहे. रुपयात घसरण झाल्यामुळे आयात माल महाग झाला आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग प्रमुख घटकांसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे कंपन्या आता आपली उत्पादने 3 ते 5 टक्क्यांनी महाग करण्याचा विचार करत आहेत. CNBC TV-18 च्या अहवालानुसार, Consumer Electronics and Appliances Manufacturers Association (CEAMA) नुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्यामुळे उद्योगासाठी अडचणी वाढल्या आहेत. 

 

 

CEAMA चे अध्यक्ष एरिक ब्रेगान्झा यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या किमती आधीच वाढत आहेत आणि आता डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आयात केलेल्या वस्तूही महाग होत आहेत. अशा परिस्थितीत आता कंपन्या नफ्यासाठी पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती 3-5 टक्क्यांनी वाढवू शकतात. एरिक यांनी जर पुढील दोन आठवड्यांत रुपया डॉलरच्या तुलनेत 75 रुपयांच्या पातळीवर पोहोचला, तर किंमती वाढू शकत नाहीत असं म्हटलं आहे.

 

 

पॅनासोनिक इंडिया सीईओ मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट सतत वाढत आहे. कंपनीने गेल्या वेळी जानेवारी 2022 मध्ये उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. आता वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर उपकरणांच्या किमती 4-5 टक्क्यांनी वाढू शकतात.

 

 

हेअर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणतात की शांघाई लॉकडाऊनमुळे घटकांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम जूनमध्ये दिसून येईल. सर्वात मोठा परिणाम एअर कंडिशनर आणि फ्लॅट पॅनल टीव्हीवर होणार आहे. फ्रिजवर त्याचा कमी परिणाम होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Advertisement

Advertisement