आष्टी दि.१० (वार्ताहर)-तालुक्यातील पिंपळा येथील एका ५२ वर्षीय महिलेने रागाच्या भरात तलसीलदारांच्या दालनात विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.न्यायालयाने जमिनीचा निकाल आपल्या बाजूने दिल्यानंतर ही तहसीलदार सातबारावर नोंद करत नसून मलाच उलट नोटीस पाठविण्यात आल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.
आशाबाई संतोष शिंदे (वय-५२) असे त्या महिलेचे नाव आहे.त्या आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील रहिवाशी असून साडेचार एकर जमिनीचा वाद होता. याबाबत न्यायालयात सुनावणी झाली आणि ही जामीन माझी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मला न्याय मिळत नसल्याचे आशाबाई शिंदे यांनी म्हटले आहे. जमिनीचा वाद वीस वर्षापासून असून,मला अप्पर विभागीय आयुक्ताने न्याय दिला पण तरी देखील गेल्या चार महिन्यापासून फेर रद्द करण्यासाठी निकालाच्या प्रति घेऊन तलाठी,तहसिल कार्यालयात हेलपाटे मारले तरी सुध्दा मला न्याय मिळाला नाही.त्यामुळे मी जिवाला कंटाळून तहसिलदार यांच्या दालनात जाऊन विष घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सध्या त्यांच्यावर आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्या निकालाप्रमाणे नोंद करू
या प्रकरणात एकाच जमिनीचे कोर्ट डिग्री आधारे एक व खरेदी खता अधारे एक दोन वेगवेगळे निकाल लागल्याने संबंधितास या कार्यालयाचे पञ 29/4/2022 नुसार आपण वरिष्ठ कार्यालयाचे किंवा न्यायालयाचे आदेश प्राप्त करून या कार्यालयास अपील दाखल निर्णय जो येईल त्या निकालाप्रमाणे आम्ही नोंद करणार आहोत.
-विनोद गुंड्डमवार,तहसिलदार आष्टी