बीडः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणूका तातडीने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकांची तयारी सुरु केली असून गट गण रचनेच्या कच्च्या आराखडयांची छाननी सुरु केली आहे. बीड जिल्हयाची प्रक्रिया शनिवारी दि. ७ रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिसाठी प्रभाग रचना करण्याचे अधिकार तुर्तास राज्य निवडणूक आयोगालाच दिले आहेत. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या गट गण रचनेवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या गट गणांच्या कच्च्या आराखडयांच्या तपासणीचा कार्यक्रम आयोगाने हाती घेतला आहे. शनिवारी बीड जिल्ह्यातील आराखडयांची तपासणी होणार आहे. त्यानंतर आठवडाभरात प्रारुप आराखडे प्रसिद्ध होतील असे अपेक्षित आहे.