Advertisement

जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर

प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा

बीड-एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून बीड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कामावर परतल्यानंतर शुक्रवारपासून (दि.२९) पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने टुरिस्ट पॅकेज जाहीर केले आहे.बीड जिल्हयातून ११ वेगवेगळ्या मार्गांवर या बसेस धावणार असून यासाठी ४४ प्रवाशांची संख्या बंधनकारक राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली. 
          एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात बस सेवा पूर्ववत होत आहे.आता उन्हाळी सुट्टी डोळ्यासमोर ठेवून पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने टुरिस्ट पॅकेज जाहीर केले आहे.यामध्ये खालील मार्गावर बसेस धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली. 

 

  • पंढरपूर-पन्हाळा-ज्योतिबा-कोल्हापूर गणपतीपुळे दर्शन 
  • पाच ज्योतिर्लिंग (परळी-औंढा नागनाथ-वेरूळ-त्रंबकेश्वर-भीमाशंकर
  • साडे तीन शक्ती पीठे (माहूर-सप्तश्रृंगी गड-कोल्हापूर-तुळजापूर
  • अष्टविनायक दर्शने
  • महाबळेश्वर-पाचंगीदर्शन 
  • तुळजापूर-अक्कलकोट-नरसोबाची वाडी-पंढरपूर दर्शन
  • वेरूळ-अजिंठा लेणी-राजूर गणपती दर्शन 
  • देऊळगाव राजा-लोणार सरोवर-शेवगाव दर्शन 
  • रायगड-महाड-अलिबाग-मुरुड जंजिरा
  •  
  • पर्यटकांना आनंद देणारी सेवा 
    राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरु करण्यात आलेल्या पर्यटन सेवेचा आम्ही अष्टविनायक दर्शन करून लाभ घेतला आहे.सदरची बस सेवा अंत्यत चांगली आणि पर्यटकांना आनंद देणारी ठरत आहे.आम्ही स्वतः या क्षणाचे साक्षीदार झालो असून जिल्ह्यातील पर्यटकांनींही या सेवेचा लाभ घ्यायला हवा. 
    मंगल कानडे (एकल महिला,सामाजिक कार्यकर्त्या,नेकनुर)

     

 

Advertisement

Advertisement