Advertisement

शेतकरी आसूड मोर्चाला विश्व मराठा संघाचा पाठिंबा-तांगडे पाटील

प्रजापत्र | Monday, 25/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा, बीड तालुक्यातील पूर्वेकडील गावांना कुंडलिकाचे पाणी वॉटर लीफ्टींग करणे,  व लोडसिडिंग मुक्त बीड जिल्हा करावा यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासनाकडून सोडवले जात नसल्याने येत्या २७ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा धडकणार असल्याची घोषणा शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी (दि.२५) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली या मोर्चाला विश्व मराठा संघाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना विश्व मराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील यांना दिले आहे.
         गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पीकविमा, पाणी व नुकसान भरपाई साठी आंदोलन सुरू आहे. रास्ता रोको आंदोलन, गावोगावी ठिय्या आंदोलन करूनही प्रशासन कसलीही दखल शेतकऱ्यांची घेत नाही. शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बीड तालुक्यातील गावोगाव पिंजून काढल्यानंतर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. हजारो शेतकरी या मोर्च्यात आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी विश्व मराठा संघ महा राज्य यांच्या तर्फे जाहीर पाठिंबा असे हनुमंत तांगडे पाटील यांनी सांगितले आहे.

 

Advertisement

Advertisement