जगन सरवदे
अंबाजोगाई-गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकलच्या चोरीच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ झाली होती.यामुळे चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांपुढे आव्हान होते.बुधवारी (दि.२०) डी.बी पथकाने तीन तरुण चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
अंबाजोगाई तालुक्यासह शहरात बँक समोरून, बिल्डिंगच्या पार्किंग मधून दवाखाना व इतर सार्वजनिक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.अज्ञात चोरटे दररोज कुठे ना कुठे मोटरसायकल चोरून प्रसार होत होते. मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते.तसेच यामुळे पोलिसांची बदनामी भरपूर प्रमाणात होत होती व पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात असे नागरिक टोमणे मारत होते.यामुळे या चोरांची टोळी पकडण्यासाठी अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय सुर्यवंशी, डी.बी. पथकातील नरहरी नागरगोजे, एलमाटे,घोळवे व इतरांनी कसोशीने तपास करून तीन कॉलेज कुमार तरुण मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.यामध्ये होंडा कंपनीच्या शाईन मोटरसायकल 2, एक बुलेट, होंडा कंपनीची ड्रीम मोटरसायकल,होंडा स्कुटी जप्त केल्या आहेत.दरम्यान चोरलेल्या मोटरसायकल स्वस्त विकत घेऊन उजळ माथ्याने फिरणाऱ्यांना जेलची हवा दाखवत नाहीत तो पर्यंत चोरीचे सत्र थांबणार नाही असे बोलले जात आहे.
दुचाकी चोरणारे तरुण पोरं
दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी संतोष बाबासाहेब मुंडे (रा.वरवटी वय-२१),प्रीतम लक्ष्मण जाधव (वय-२३ रा.नागझरी) व प्रशांत पंडित मुंडे (वय-१९) या तरुणांना जेरबंद केले आहे.थोड्यावेळात या आरोपींना न्यायालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.
आरोपी चांगल्या घरातील
या टोळीकडून खेड्यापाड्यात मोटरसायकल विकल्याची चर्चा असून यातील एक आरोपी मुलगा माजी सरपंचाचा आहे.तर दुसरा मुलगा हा माजी सैनिकाचा असून चांगल्या घरातील मुले चोरीकडे वळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.