चौसाळा-पंतप्रधानांपासून रामदेव बाबा ते सर्वसामान्य नागरिक पहाटे उठून योगासन करत असतात.नरेंद्र मोदी यांनी स्वतः निरोगी शरीरासाठी योगासने रोज पहाटे उठवून करायला हवेत असे मत व्यक्त केलं होते.मात्र बीड तालुक्यातील चौसाळामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सकाळी ११ वाजता योगासने करून इतरांना त्याचे धडे दिले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढांसह,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान आरोग्य राज्यमंत्र्यांच्या योगासनांची सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
उस्मानाबाद येथील नियोजित कार्यक्रमास जाण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या शनिवारी रात्री अचानक बीडला मुक्कामी आल्या. शासकीय विश्रामगृहात त्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी स्वागत केले. या वेळी नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचीही उपस्थिती होती. खासदार डॉ. प्रीतम मुंडे व अामदार विनायक मेटे यांनीही शासकीय विश्रामगृहात मंत्री भारती पवारांची भेट घेत चर्चा केली. सकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. स्थानिक नागरिकांनी काही प्रश्न, अडचणींबाबत त्यांना निवेदन दिले. रविवारी सकाळी ११ वाजता चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. या वेळी आरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत सकाळी ११ च्या सुमारास डॉ.भारती पवार यांनी योग शिबिर घेतले. यावेळी भर उन्हात योगासने करण्यात आल्यामुळे याची जिल्हाभर चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
प्रजापत्र | Monday, 18/04/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा