Advertisement

डिस्चार्ज नंतर काय म्हणाले धनंजय मुंडे ?

प्रजापत्र | Saturday, 16/04/2022
बातमी शेअर करा

बीड : चार दिवसापूर्वी मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झालेल्या मंत्री धनंजय मुंडेंना शनिवारी सकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.त्यानंतर त्यांनी आपणास डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून लवकरच ताजातवाना होऊन पुन्हा आपल्यात येईल असे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=Pf3SKO5TNPI&feature=youtu.be

 

       राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांना अचानक भोवळ आल्याने चार दिवसापूर्वी त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. दरम्यान रुग्णालयात स्वतः अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पंकजा आणि प्रीतम मुंडे व राज्यातील अनेकांनी त्यांची भेट घेतली होती. 
शनिवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी झाल्यानंतर मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले असून 'आता आपली प्रकृती चांगली आहे. मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी काही काळ विश्रांती करणार आहे. त्यावेळी कोणीही भेटायला यायचे श्रम करू नयेत . मी स्वतः लवकरच तुमच्यात येईल ' असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

 

 

Advertisement

Advertisement