Advertisement

उड्डाण पुलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 13/04/2022
बातमी शेअर करा

परळी - शहरातील उड्डाणपुलावरून उडी घेऊन एका २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सदरील महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रोहीणी रामहरी नागरगोजे (वय २६ वर्षे, रा. अरुणोदय कॉलनी, परळी शहर) या महिलेने आज

सकाळी परळी शहरातील उड्डाण पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते.

Advertisement

Advertisement