Advertisement

केजचा भूमिपुत्र करतोय मुंबईतील कोरोना रुग्णांवर उपचार

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

केज-तालुक्यातील कोरेगाव येथील डॉक्टर सतीश वसंत तांदळे हे सध्या मुंबई येथील प्रसिद्ध नायर रुग्णालयात कोरोना रुग्णांनावर उपचार करत आहेत. मुंबई मध्ये कोरोनाचे  रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांवर यशस्वी व वेळेत उपचार व्हावेत यासाठी शासनाने मुंबईतील अनेक हॉस्पिटल हे कोविड  हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहेत. त्यामध्ये नायर हॉस्पिटलचा देखील समावेश आहे.नायर हॉस्पिटलमध्ये सध्या १०३५ रुग्ण उपचार घेत आहेत. गेली दोन महिन्यापासून डॉ.सतीश तांदळे हे रुग्णांवर उपचार करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
                         डॉ.सतीश तांदळे हे महाराष्ट्र राज्यव्यापी निवासी डॉक्टर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व नायरचे अध्यक्षही आहेत. सदरील जबाबदारी देखील त्यांच्यावर असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न शासनाकडे मांडत त्यांच्या अडचणी सोडत आहेत.या संकट काळात अनेक डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये हे डॉक्टर उपचार घेऊन बरे झाले व परत एकदा जिद्दीने कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत असे डॉ. सतीश तांदळे सांगत आहेत.
 कुटुंबापासून दूर राहून काम काम करण्यात काहीच अडचण वाटत नाही. कारण जे रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत ते आमचं कुटुंबच आहे त्यांचा उपचार करणे आमचं प्रथम कर्तव्य व आमचा धर्म आहे हाच विचार करत करत संपूर्ण डॉक्टर सद्या या कोरोना संकटाशी लढत आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डॉक्टर सतीश तांदळे हे नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांनावर उपचार करत व महाराष्ट्र राज्यव्यापी डॉक्टर  संघटनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर  उपचार करत असलेल्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लावत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोनाच्या या संकटात आपल्या केज चा भूमीपुत्र डॉ. सतीश तांदळे हे देखील कोरोणा योद्धा म्हणून लढत आहेत याचा केज तालुक्याला अभिमान वाटतो त्यांच्या या कार्यास सलाम. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement