Advertisement

शिवसेना आ.प्रताप सरनाईक अडचणीत

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई-शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 
        सन 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचे समोर आले. जवळपास 13000 गुंतवणूकदारांच्या  5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 

 

Advertisement

Advertisement