Advertisement

इंधन दरवाढ थांबेना

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

बीड-देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एक दिवसाच्या स्थिरतेनंतर आज पुन्हा इंधनदरात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ८३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर बीडमध्ये पेट्रोल ११३.८० रुपयावर गेले आहे. तर, डिझेल ९६.५३ रुपये प्रतिलीटर आहे.

   दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढत असल्यानेच देशांतर्गत इंधनाचे दर वाढत आहेत, अशा शब्दांत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत दरवाढीचे समर्थन केले. मात्र, नागरिकांना परवडेल अशा किंमतीत इंधन उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement