केज दि.२७ - जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व आरोग्य विभागाने रक्तदानाचे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत टिम अतिथी व रक्तदाता परीवार केज यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत भरभरून प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरात साठ पेक्षा जास्त युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करुन कोरोना लढ्यातील शहिद झालेल्या पोलिस अधिकारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी व सफाई कामगार या योद्ध्यांना आदरांजली वाहिली.शिबीरास रक्तदात्यांचा भरभरुन ओघ सुरू होता. काहींना तर ब्लड स्टोरेज बॅग संपल्यामुळे रक्तदान करता आले नाही.या शिबिरास टिम अतिथी व रक्तदाता परीवार केज तसेच तात्या रोडे, शेखर थोरात, सौरभ जाधव,आकाश नेहरकर,अशोक खेत्रे,अक्षय चटप यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
या रक्तदानाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, पत्रकार धनंजय कुलकर्णी, अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे,सुरज भैय्या, बाळासाहेब पवार, डॉ.बारगजे सर, ढाकेफळचे मा.सरपंच भाऊसाहेब घाडगे व ब्लड बँकेचे टिम उपस्थित होती.
Leave a comment