सय्यद शाकेरअली
किल्लेधारूर-केज-धारूर रस्त्यावर कासारपाटीजवळ उभ्या असणारे बसला ओव्हर टेक करताना वेग न आवरल्याने स्विफ्ट डिझायर कार उभ्या असणारे टॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरदार आपटल्याने झालेल्या भिषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघाताची भीषणता पाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कळंब येथील सुरेश लमके हे आपल्या पत्नी व आठ वर्षीय मुलासह स्विफ्ट कारने (क्र.एम.एच२५-ए.एस.८९७५ ) धारुरकडे जात होते. यावेळी केज-धारूर रस्त्यावर कासारी पाटी जवळ प्रवाशी उतरण्यासाठी बस उभी असल्याने केजकडून धारूरकडे जाणारी त्यांची स्विफ्ट कार ही वेगात बसला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात ऊस तोड कामगार घेऊन जाणाऱ्या व रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक्टरच्या ट्रालीवर जाऊन जोरात धडकली.
यामध्ये कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने कारला एअर बँग असल्याने त्यामधील तीन प्रवाशी बालंबाल बचावले. अपघाताची भीषणता मात्र मोठी असल्याने अपघातस्थळी गर्दी झाली होती. कार मधील जखमी प्रवाशांवर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात जखमी संगिता सुरेश लमके (वय-३५ रा.कळंब) या किरकोळ जखमी झाल्याचे कळते. यावेळी विशाल लमके हा आठ वर्षीय बालक त्यांच्या सोबत होता.
बातमी शेअर करा