Advertisement

डिझेल थेट २५ रुपयांनी महागले

प्रजापत्र | Sunday, 20/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई-गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. दरम्यान, आता घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी महागले आहे. घाऊक ग्राहकांना होणाऱ्या डिझेलच्या विक्रीमध्ये प्रतीलिटर तब्बल २५ रुपयांनी वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र पेट्रोल पंपावरून होणाऱ्या डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

 

      या महिन्यामध्ये पेट्रोल पंपावरून होणाऱ्या विक्रीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या बस,कारखाने आणि मॉलसारख्या घाऊक ग्राहकांनी पेट्रोल पंपावरून डिझेलची खरेदी केली. सर्वसाधारणपणे ते पेट्रोल कंपन्यांकडून थेटपणे इंधन खरेदी करतात. त्यामुळे तेलाची किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेलसारख्या कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे आता थेट २५ रुपयांनी डिझेल महागले असून बस,कारखाने,मॉल आणि इतर घाऊक ग्राहकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. 

 

दरम्यान, १३६ दिवसांपासून तेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे कंपन्यांना या दरांनी अधिक तेल विकण्याऐवजी पेट्रोलपंप बंद करणे अधिक व्यावहारिक पर्याय असेल. २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने विक्री घटून शून्यावर आली तेव्हा आपले सर्व १४३२ पेट्रोल पंप बंद केले होते. सूत्रांनी सांगितले की, हीच स्थिती आता तयार होत आहे. घाऊन ग्राहक पेट्रोल पंपावरून खरेदी करत आहेत. त्यामुळे रिटेलर्सचा तोटा वाढत आहे.दरम्यान, मुंबईमध्ये घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत वाढून १२२.०५ रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे. तर पेट्रोल पंपांवर पेट्रोलची विक्री ही ९४.१४ रुपये दराने होत आहे. दिल्लीच्या पेट्रोल पंपांवर डिजेल ८६.६७ रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. तर घाऊक ग्राहकांसाठी त्याचा दर हा ११५ रुपये प्रति लिटर एवढा आहे. 
 

Advertisement

Advertisement