Advertisement

नळदुर्ग येथे २० मार्चला ७ वे बौद्ध साहित्य संमेलन;अध्यक्ष पदी पद्मश्री लक्ष्मण माने

प्रजापत्र | Saturday, 19/03/2022
बातमी शेअर करा

नळदुर्ग (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ७ वे बौद्ध साहित्य संमेलन रविवारी २० मार्च रोजी येथील बी.के.फंक्शन हॉल येथे संपन्न होणार आहे.
   नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे बौद्ध साहित्य परिषद आंबाजोगाई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष थोर साहित्यीक , उपराकार पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने असून उद्घाटक साहित्यिक तथा  आमदार लहु कानडे (श्रीरामपूर) तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री  मा.मधुकररावजी चव्हाण , मा.यशपाल सरवदे (बौद्ध साहित्याचे अभ्यासक)हे उपस्थित राहणार  आहेत . संमेलनाचे  स्वागताध्यक्ष  माजी नगरसेवक धनंजय  शिंगाडे हे आहेत.

 

 

     या संमेलनातील परिसंवादातील  सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे असून दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदनशिवे (कवठेमहांकाळ) यांच्या अध्यक्षतेखाली दुपार सत्रात कविसंमेलन होणार आहे. तर समारोपाच्या सत्रात  आमदार राणाजगजितसिंह पाटील ,जिल्हा परिषद  अध्यक्षा अस्मिता कांबळे , उपस्थित राहणार आहेत.

 

 

      या बौद्ध साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यीक ,कवि उपस्थित राहणार असून उदघाटन, परिसंवाद, कविसंमेलन व पुरस्कार वितरण आणि समोर आशा चार सत्रात एकदिवसीय हे बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.  

 

  तरी जेष्ठ साहित्यीक, नवोदित साहित्यिक, कवी यांनी मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष  प्राचार्य कमलाकर कांबळे,संयोजक परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे,भैरवनाथ कानडे , एस. के.गायकवाड बाबासाहेब बनसोडे, प्रमोद कांबळे,अरुण लोखंडे ,उमेश गायकवाड,सह संयोजन समितीने  केले आहे.

Advertisement

Advertisement