Advertisement

बलात्कारप्रकरणी दहा वर्ष सक्तमजुरी व दंड

प्रजापत्र | Monday, 14/03/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सदर प्रकरणात अप्पर सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

 

या प्रकरणातील आरोपी अशोक मारुती सरवदे, (रा. साबळा, ता. केज) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आरोपीस सदरचे प्रकरणात मा. न्यायालयाने जामीन दिला असता व जमानतीवर सुटल्यावर सदर आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला व नवरा बायको सारखे राहून ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुध्दा अनेकवेळा बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदर अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले व अनेकवेळा बलात्कार केला. सदर फिर्यादीवरून २८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले.

 

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. आर. एम. ढेले, व अॅड. नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे. कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पहिले.

Advertisement

Advertisement