Advertisement

धारुरच्या घाटात भीषण अपघात

प्रजापत्र | Monday, 14/03/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-आज (दि.१४) सकाळी ९ च्या सुमारास उस्मानाबादहून माजलगावकडे सिमेंट घेवून जाणारा ट्रक धारुर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी असून त्यास रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  
( Accident in Dharur Ghat; The truck carrying the cement overturned. )
         राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र 548 सी वरील धारूर (Dharur) माजलगाव रस्त्यावर अवघड घाट (Ghat) आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. जड वाहने सतत ताबा सुटल्याने खोल दरीत जाण्याचे व रस्त्यावर पटली होवून अपघात होण्याची संख्या जास्त आहे.
काही दिवसांपुर्वीच सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे सकाळी साडेनऊ चे दरम्यान अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मिटर खोल कोसळला होता. या अपघातात गाडीचा चालक पैंगबर पटेल हा जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.यानंतर दोनच दिवसात  साखर घेवून जाणारा ट्रकचा (क्र. एम.एच. 48 बी 2648) अपघात होवून झाडाला अडकला होता. यामुळे खोल दरीत कोसळन्यापासून बचावला होता. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले होते. यानंतर आज पुन्हा सिमेंट ट्रक रस्त्यावर पटली झाला आहे. 
आज सोमवारी  (दि.14) धारुर घाटात पुन्हा सिमेंट घेवून जाणारा ट्रक (क्र. एम.एच. 25- पी-9547) टलटी होवून अपघात घडला. उस्मानाबादहून माजलगावकडे सिमेंट घेवून जाणाऱ्या चालकाचे घाटातील वळणावर ताबा जावून ट्रक उजव्या बाजूस पलटी झाला. ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. 
अद्याप चालकाची व इतर माहिती समोर आलेली नाही. मात्र गंभीर जखमी चालकास तात्काळ उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे. सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट (Dharur Ghat) मृत्यूचा सापळा बनत आहे. घाट रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Advertisement

Advertisement