Advertisement

कोरोना लसीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यां कडून दिलासादायक बातमी

प्रजापत्र | Friday, 16/10/2020
बातमी शेअर करा

2021च्या सुरुवातीला भारतामध्ये एकापेक्षा जास्त लशी उपलब्ध होऊ शकतील 

दिल्ली  :2021च्या सुरुवातीला भारतामध्ये एकापेक्षा जास्त लशी उपलब्ध होऊ शकतील असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलंय सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या लशीसोबतच भारत सरकारने निर्माण केलेला टास्क फोर्स हा इतर औषध उत्पादक कंपन्यांसोबतही चर्चा करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.जगभरात विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसवरच्या लशीचं संशोधन सुरू आहे.यापैकी 10 लशींच्या चाचण्या या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात आलेल्या आहेत. या लशी परिणामकारक आणि सुरक्षित आहेत का हे तिसऱ्या टप्प्यात सिद्ध होणं महत्त्वाचं आहे.लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम कशी राबवायची, यासाठीची योजना आखण्यात येत असल्याचंही हर्ष वर्धन यांनी म्हटलंय. सोबतच भारतामध्ये सध्या सुरू असणाऱ्या विविध लशींच्या चाचण्या आणि त्यांचे निकाल याची माहितीही आपण घेत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.
 तसेच डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीचे तिसऱ्या टप्प्याचे निकाल सुद्धा काळातील असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटल आहे 

 

Advertisement

Advertisement