किल्लेधारूर- येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष देशपांडे यांना सतत वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) डॉ. सुरेश साबळे यांनी दणका दिला असून कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत.
( Surgeons take action against doctors at Dharur Rural Hospital; Dismissed from service. )
धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी (Medical officer) व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी सतत आमरण उपोषण, आंदोलन करण्यात येत असताना सतत गैरहजर राहणाऱ्या वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कसलाही परिणाम होत नसल्याचे दिसुन येत आहे.
धारुर (Dharur) येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात एकुण 29 पदे मंजूर आहेत. ज्यात 1 वैद्यकीय अधिक्षक, 3 वैद्यकीय अधिकारी, 7 परिचारिका, 7 चतुर्थ श्रेणी कर्मचारी, 2 लॕब टेक्नेशियन आदीचा समावेश आहे. यापैकी वैद्यकीय अधिक्षकासह एक वैद्यकीय अधिकारी रिक्त असून दोन रजेवर आहेत. परिचारिकापैकी (Hostess) दोन जागा रिक्त आहेत तर एकाची नुकतीच बदली झाली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांत 4 कक्षसेवकांच्या जागा व एक लॕब असिस्टंट यांच्या जागा रिक्त आहेत.
ग्रामीण रुग्णालय सध्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे असून अडचण नसुन खोळंबा अशा स्थितीत आहे. यामुळे दि.10 रोजीच्या सर्वरोग निदान शिबिरात थेट मंचावर ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन व राष्ट्रवादीचे नेते माधव निर्मळ यांनी अपुऱ्या कर्मचारी वर्गावर खंत व्यक्त केली. तय सामाजिक कार्यकर्ता अतिक मोमीन यांनी याप्रश्नी डॉ.माले व डॉ. साबळे यांना निवेदन दिले.
ग्रामीण रुग्णालयात दि.10 मार्च रोजी सर्वरोग निदान शिबिरातही गैरहजर राहणाऱ्या व रिक्त पदाच्या प्रश्नावर थेट सहसंचालक डॉ. माले व जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) डॉ. साबळे यांच्या समोर तक्रारी करण्यात आल्यानंतर याची दखल घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुसऱ्याच दिवशी सतत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास कार्यमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
दि.11 मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी काढलेल्या आदेशात वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष रामचंद्र देशपांडे यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाचे सतत उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानूसात नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केले असल्याने त्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे नमुद केले.