अंबाजोगाई-तालुक्यातील मौजे चिचखंडी येथील तरुणांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.दोन दिवसात दोन खूनाच्या घटनेसह विविध घटना घडल्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील मौजे टाकळी शिराढोन येथील दिपक दगडे वय चाळीस याचा मौजे साकुड शिवारातील मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर आडराणात गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस येवून चोवीस तास होत नाही,तोवरच मौजे चिचखंडी येथील बाबुराव विठ्ठल गडदे (वय-४८) हे
सकाळी सात वाजता गावाबाहेरच्या मंदिरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडले.मात्र चार वाजले तरीदेखील घर परत आले नाहीत.तेंव्हा घरच्यांनी शोधाशोध केली असता गडदेवाडी शिवारात रोडपासुन १०० मीटर अंतरावर नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.दरम्यान प्रथमदर्शीनी पोलिसांनी वर्तविलेल्या अंदाजावरून बाबूराव गडदे यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा अंदाज आहे.बाबुराव हे विवाहित असुन त्यांना पत्नी, दोन मुले आहेत.त्यापैकी एक मुलगा लिंबा कारखाना उसतोडणीस गेलेला आहे.एक मुलगा शिक्षण घेतो आहे.दरम्यान या घटनेमुळे गडदे परिवार उघड्यावर आले आहे.सदरील घटनेची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेवुन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सांगितले आहे.
बातमी शेअर करा