बीड-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडेश्वरी देवीची यात्रा जरी रद्द करण्यात आली असली तर भाविकांना घर बसल्या खंडेश्वरी देवीची आरती व दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.ऑनलाइन दर्शनासाठी खंडेश्वरी ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन द्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. बीड वासीयांसाठी आपल्या ग्रामदेवतेच्या आरतीचे व दर्शनाचा लाभ हा ऑनलाईन पद्धतीने सकाळी 8.30 व संध्याकाळी 8.30 वाजता देणार आहे. दैनंदिन आरती सोबतच 25, 26, 27 ऑक्टोबर रोजी आपणास नवचौंडी यज्ञ पाहता येणार आहे.यासाठी आपल्याला http://shorturl.at/bBS27 या लिंक वर जाऊन युट्यूब द्वारे दर्शन घेता येणार आहे. हाच कार्यक्रम आपण फेसबुकच्या रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या पेज वर पाहू शकाल.दरम्यान कोरोनाच्या काळात मंदिरे बंद आहेत म्हणून आपल्यासाठी खंडेश्वरी देवस्थान ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन ने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन खंडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष समीर काझी,सचिव राहुल तांदळे व प्रोजेक्ट चेअरमन आदेश नहार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा