बीड-राज्य शासनाच्या मिशन बिगिनींग अंतर्गत आता आठवडी बाजार, ग्रंथालय, मेट्रो सेवा सुरु होणार असून बीड जिल्ह्यातील दुकाने रात्री 9 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्या संदर्भात आदेश काढले आहेत.
आदेशात पुढे म्हटले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार कंटनेमेंट झोन बाहेर काही बाबींना परवानगी देण्यात येत आहेत. आजपासून (दि.15) आठवडी बाजार भरविता येणार आहेत. यात जनावरांच्या बाजाराचाही समावेश आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे म्हटले आहे. परवानगी असलेल्या व्यवसायांना रात्री 9 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, क्लासेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार असून ऑनलाईन सुरु शिक्षणासह आयटीआयसारख्या अल्प मुदतीच्या प्रशिक्षण केंद्रांना परवानगी दिली आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयोगशाळा सुरु ठेवता येतील मात्र तांत्रिक शिक्षण विभागाच्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. खाजगी व शासकीय वाचनालये, अभ्यासिका उघडता येणार आहेत. गार्डन, पार्क व इतर सार्वजनिक ठिकाणे खुली करण्यात येत आहेत. तसेच, रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अनेक बाबींना शिथीलता मिळाल्याने सर्वकाही पूर्वपदावर येत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बातमी शेअर करा