Advertisement

धारुरच्या तहसीलदार पदाचा पदभार भारस्कर यांच्याकडे .

प्रजापत्र | Monday, 28/02/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.28 फेब्रुवारी - धारुर तालुक्यातील रिक्त होत असलेल्या तहसीलदार पदाचा पदभार वडवणीचे तहसीलदार श्री. दत्ता भारस्कर यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

 

धारुरच्या तहसीलदार श्रीमती वंदना शिडोळकर या आज सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीनंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. शिडोळकर यांनी वयाची 58 वर्ष पुर्ण केल्याने नियत सेवेतून सेवा निवृत्त झाल्या.

 

 

शिडोळकर यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार वडवणीचे तहसीलदार श्री. दत्ता भारस्कर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काढले आहेत.

Advertisement

Advertisement