अंबाजोगाई-तालुक्यातील बागझरी परिसरात राहणारे काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुली साधना (वय ६) आणि श्रावणी (वय ४) यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (दि.२६) सकाळी घडली. तर, पत्नी भाग्यश्री (वय २८) आणि मुलगा नारायण (वय ८ महिने) यांची प्रकृती चिंताजनक होती मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. आई भाग्यश्री चा 9:30च्या दरम्यान उपचार चालु असताना मृत्यु झाला शुक्रवारी (दि.२५) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. मृत्यु चे कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच सांगता येईल असे डॉक्टरांनी संगितले
बातमी शेअर करा