मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचं 'ऑपरेशन एअरलिफ्ट' यशस्वी झालं आहे. युक्रेनमधील 219 भारतीयांना घेऊन हे विमान मुंबईमध्ये दाखल झालं आहे.
मुंबईमध्ये विमान नुकतंच लँड झालं आहे. मुंबई विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. विमानात जास्त विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्धसंघर्ष सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर युक्रेनमधील 219 भारतीयांना सुखरुप भारतात परत आणण्यात आलं आहे.
युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्याची मोहीम वेगाने सुरू झाली आहे. भारताचं 'ऑपरेशन एअरलिफ्ट' यशस्वी झालं आहे. बुखारेस्टहून एअर इंडियाचं पहिलं विमान दाखल झालं आहे. भारतासाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सध्या युक्रेनमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे.
                                    
                                
                                
                              
