Advertisement

विषबाधेने दोन चिमुकल्यांचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 26/02/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-तालुक्यातील बागझरी परिसरात एक दुर्दैवी घटना आज (दि.२६) सकाळी समोर आली आहे.काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या घरात विषबाधेमुळे त्यांच्या दोन मुली साधना (वय ६) आणि श्रावणी (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे. 
                   रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील भाग्यश्री (वय-२८) आणि त्यांचा मुलगा नारायण (वय ८ महिने) यांची देखील प्रकृती चिंताजनक असून या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Advertisement

Advertisement