Advertisement

थांबरे! थांबरे! पावसा ,परतीच्या पावसांने पिकांची नासाडी

प्रजापत्र | Monday, 12/10/2020
बातमी शेअर करा

सिरसदेवी: परिसरात रविवारी सकाळ पासुन सुरु झालेला पाऊस दिवस रात्र मुसळधार पडत होता.पाऊस पडू नये म्हणून शेतकरी बळीराजाला साकडे घालत होते. हातातोंडाशी आलेला घास नियतीने घेतला असल्याने शेतकरी चिंतेच्या छायेत अडकला आहे .
                     त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱयांच्या शेतातील उभ्या पिकांचे जबर नुकसानीला हा पाउस कारणीभूत ठरला आहे.राज्यात आणि मराठवाडयात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना वैताग आणला आहे.   हाताशी आलेले कपाशीच्या पिकांच्या वाती झाल्या आहेत. तर सोयाबीन आणि मक्याची अवस्था वाईट आहे. म्हणूनच पावसाच्या 'सरी आता गेल्या डोक्यावरी ' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या कपाशी, मका, सोयाबीन ही महत्त्वाची पिके या परतीच्या पावसाने धोक्यात आली आहेत सामान्य पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे पाने लाल झाली कापसाच्या फुटलेल्या बोडावर पावसाचे पाणी पडल्याने कापसाचे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत जाहीर करा अशी मागणी सिरसदेवी परिसरातील शेतकरी करीत आहेत.   शेतकरी वर्गाला प्रचंड  हतबल होऊन या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कापूस व तुरीच्या पिकांत पावसानं पाणीच पाणी शेतात करून टाकले .यामुळे प्रशासनाने पंचनाम्याची गती वाढवुन तात्काळ मदत करावी  अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. 

Advertisement

Advertisement