मुंबई-राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
दरम्यान, मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याने या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सातवाजेपासून चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास अटक केली.
बातमी शेअर करा