Advertisement

बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी जयदत्त क्षीरसागर प्रयत्नशील

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई दि.२१ (प्रतिनिधी)-केंद्र सरकारची योजना आहे,की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय कॉलेज  यामाध्यमातून बीडला शासकीय मेडिकल कॉलेज व्हाव तसेच होमिओपॅथी शास्त्राच्या विविध मागण्यांबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२१) वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी सचिव विजय सौरभ,वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंग उपसचिव शिंदे हेही उपस्थित होते.
          केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण देशभरात जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे निश्चित केले आहे.या धोरणानुसार बीड शहरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यापूर्वीच केली होती. सोमवारी (दि.२१) मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.या बैठकीस सचिव विजय सौरभ तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त व अधिकारी यांची उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय असून अंबाजोगाई प्रमाणेच बीड शहरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असते या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास आष्टी-पाटोदा-शिरूर-बीड-वडवणी आणि चौसाळा या परिसरातील रुग्णांसाठी मोठी सोय होणार आहे.या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पाठपुरावा करत आहेत. अंबाजोगाई येथे ५० वर्षापूर्वी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे मात्र आता दिवसेंदिवस वाढत्या गरजा आणि रुग्ण संख्या लक्षात घेता बीड शहरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात नवीन वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही त्याच बरोबर  होमिओपॅथिक शास्त्राच्या विविध मागण्यांबाबत चर्चा होऊन त्या सोडवाव्यात अशी मागणीही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.राज्य सरकार कडून याबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवल्यास बीडमध्ये महाविद्यालय सुरू होईल, केंद्र सरकारच्या धोरणानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय या योजनेअंतर्गत हे महाविद्यालय झाल्यास जिल्हावासीयांना साठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.यावेळी आ विक्रम काळे, पृथ्वीराज पाटील,बाळासाहेब पवार डॉ सोमनाथ गोसावी,डॉ बाळकृष्ण गायकवाड डॉ प्रमोदींनी पागे,प्रबंधक सोनमनकर, माजी प्राचार्य डॉ अरुण भस्मे हेही उपस्थित होते,असोसिएशन ऑफ प्रायव्हेट होमिओपॅथी मेडिकल कॉलेजेस या संघटनेचे वतीने बैठकीचे आयोजन करण्याची विंनती करण्यात आली होती. 

 

Advertisement

Advertisement