बीड-शासकीय कर्तव्य बजावत असताना गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा आणि संबंधित पोलीस ठाणे प्रमुखाला निलंबित करावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी अन कर्मचाऱ्यांनी आज (दि.२१) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे हे वाळू माफियांवर कारवाई करत असल्याच्या रागातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करताना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना फौजदारी संहिता 1973 मधील कलमान्वये संरक्षण आहे.मात्र तरीही गेवराईच्या ठाणे प्रमुखांनी गुन्हा दाखल केला आहे.अशा पध्दतीने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर खोटे गुन्हे दाखल झाले तर त्यांचे मनोधैर्य खचू शकते.त्यामुळे या प्रकरणात तातडीने गुन्हा रद्द करून पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.