Advertisement

प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात

प्रजापत्र | Saturday, 19/02/2022
बातमी शेअर करा

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांच्या गाडीला आज सकाळी जोगेश्वरी  विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी  कॅम्पजवळ अपघात झाला. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखे असल्याचे प्रवीण दरेकरांनी सांगितले. तिन्ही अपघातात मोटारसायकल स्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे माझ्यासह माझ्यासहका-यांना देखील संशय निर्माण झाला असून याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी सांगितले. तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावं लागतं. परंतु अशा पध्दतीने अपघात होत असल्याने मनात शंका आहे. तिन्हीवेळा गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. पंधरा दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले.

 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ अपघात

विरोधी पक्षनेता असल्यानंतर संपुर्ण राज्यात फिरावं लागतं. तसेच अनेकदा हा प्रवास किती दिवस होईल हेही निश्चित नसतं. पण दरेकरांच्यासोबत सुरू झालेली अपघाताची मालिका संपण्याचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आज कामानिमित्त प्रवीण दरेकर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळून जात असताना त्यांच्या समोरून अचानक एक मोटारसायकल स्वार आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक लोक गाडीत होती. त्यामुळे सहका-यांना काहीतरी घातपाताचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या गाडीला देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्याची चौकशी करायला लावणार आहे.

 

तिन्ही अपघात एकसारखे

कामानिमित्त मालेगाव गेले असता त्यांच्या गाडीला पहिला अपघात झाला. त्यावेळी सुध्दा त्यांच्या गाडीच्या समोर अचानक एक मोटारसायकल चालक आल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्यावेळी चालकांने वेगावर कंट्रोल त्यामुळे कोणालाही इजा झाली. परवा खंडाळ्या सुध्दा अचानक एक मोटारसायकल स्वार अचानक पुढे आला त्यावेळी सुध्दा आमच्या गाडीला नुकसान झालं. आज सुध्दा जोगेश्वरी लिंक रोडवरती अपघात झाल्याने प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सहका-यांच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून अपघाताची चौकशी करावी अशी मागणी करणार आहेत. दरेकरांच्या गाडीला तिन्हीवेळा झालेल्या अपघातात एकसारखे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत झालेल्या अपघातात दरेकरांना किंवा त्यांच्या सहका-यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

Advertisement

Advertisement