Advertisement

धारुर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Wednesday, 16/02/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.16 फेब्रुवारी - धारुर (शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी धारुर पोलिसात दोन आरोपी विरुध्द आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार  केल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या  जबाबानूसार नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपी याने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसर्‍यादिवशी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व सदरील गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली.  

 

तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण नरसिंह फोटो स्टुडिओ मध्ये गप्पा मारत बसले असता आरोपी क्रमांक एक हा फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी  यातील आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.

 

गु.र.न.22/2022 नुसार धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित   मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक दोन्ही रा. धारुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक व्हि. एस आटोळे करीत आहेत.

Advertisement

Advertisement