अंबाजोगाई-तालुक्यातील बर्दापुर फाटा ते गाव या रस्त्यावर असणार्या लक्ष्मी मशनरी स्टोअर्सच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गल्यातील २ लाख ८६ हजारांची रक्कम लांबविली असल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. बलभिम विश्वनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिसा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी.चोपने करत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असून शहरातील चोर्याच्या नंतर आता चोरट्यांनी ग्रामिण भागामध्ये आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. बर्दापुर फाटा ते गाव या रस्त्यावर बलभिम विश्वनाथ मोरे यांचे लक्ष्मी मशनरी स्टोअर्स असून १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी रात्री दुकानाचे कुलूप बंद करून घराकडे गेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर तोडल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश करून सामान व गल्ल्याची तपासणी केली असता गल्ल्यातील २ लाख ८६ हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बर्दापुर पोलिसांना फोन करून घटनास्थळावर बोलविली. पोलिसांनी या चोरीचा पंचनामा करत अज्ञात चोरट्याने दोन लाख 86 हजाराची रोकड पळविल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक एस.बी.चोपने करत आहेत.