Advertisement

काळ्या बाजारात जाणारा सुमारे ७ लाखा चा रेशनच्या तांदळासह तिघे ताब्यात

प्रजापत्र | Saturday, 12/02/2022
बातमी शेअर करा

केज दि.१२ - सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने  गुजरातकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला ५५८ कट्टे तांदूळ ज्याची किंमत ६ लाख ९८ हजार रु. असा तांदूळ आणि ट्रक यासह ३१ लाख ९८ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तिघा विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
               

   या बाबतची माहिती अशी की, दि. ११ फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा स्वामी यांना अशी माहिती मिळाली की, माजलगाव येथील ब्रह्मवाडी येथील युसुफ इसाक आतार हा आपले स्वतःचे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या रेशनचा तांदूळ लोकां कडून घेऊन त्याच्या घरा जवळील पत्र्याच्या शेडच्या गोडाऊन मध्ये जमा करून ठेवलेला आहे. तो तांदूळ  काळ्या बाजारात विक्री करण्या करिता ट्रकमध्ये भरून गुजरात राज्यात पाठविणार आहे. अशी माहिती मिळाल्या वरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे उपविभागीय कार्यालयाचे पोलीस कर्मचारी, पोलीस ठाणे माजलगाव शहराचे सपोनि राठोड व पोलीस अमलदार यांना पंचासह सदर ठिकाणी पाठविले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. १२ फेब्रुवारी शनिवार रोजी पहाटे ५:३० वा. छापा मारला. त्यात सदर ठिकाणी एक ट्रक क्र. (एम एच१५/एफ व्ही ६३५७) आणि तीन ईसम मिळून आले. त्याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदर ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यात रेशनच्या तांदळाने भरलेले ५५८ कट्टे आहेत. सदरचा तांदूळ युसुफ इसाक आतार यांचा असून हा माल गुजरात येथे घेऊन जात आहोत. असे सांगितले. त्यांना सदर मालाचे कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन ट्रकची पाहणी केली असता; ट्रक मध्ये ५५८ कट्टे तांदूळ त्याचे वजन २७ क्विंटल ९२० किलो ग्रॅम आणि किमत ६ लाख ९८ हजार रु. व २५ लाख रु. किंमतीची ट्रक. असा एकूण ३१ लाख ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तिघांना मुद्देमालासह पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे आणून त्यांच्या विरुद्ध पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस नाईक बालाजी दराडे यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला आहे.
                     

 सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बीड, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक  पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे माजलगाव शहर येथील सपोनि अविनाश राठोड, उपविभागीय कार्यालय केज येथील पोलीस आमदार बालाजी दराडे, राजू वंजारे व पोलीस ठाणे माजलगाव शहर येथील पोलीस आमदार प्रभाकर नरवडे, संदीप मोरे, वसंत करे, श्रीमंत पवार, बाळासाहेब डापकर यांनी केली. आरोपी युसुफ इसाक आतार, रा. ब्रह्मगाव माजलगाव, ड्रायव्हर हनुमंत भगवान वराडे, ड्रायव्हर रा. रोशनपुरा बालेपीर, बीड आणि सतीश शेषराव वाघमारे रा. चराटा फाटा बीड यांच्या विरुद्ध कार्यवाही केली.

Advertisement

Advertisement