Advertisement

बीड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून मनाई आदेश लागू

प्रजापत्र | Thursday, 10/02/2022
बातमी शेअर करा

बीड-जिल्हयात होणार्‍या राजकीय, सामाजिक हालचाली व घडामोडींमुळे मोर्चे निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको आंदोलने यासारखे आंदोलने होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी बीड जिल्ह्यात गुरुवारी (दि.१०) मध्यरात्रीपासून मनाई आदेश लागू केले आहेत.

 

 

या कालावधीकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये पांच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही. तसेच पोलीस अधिक्षक बीड यांचे अहवालावरुन जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहेत. शासकिय कर्तव्य पार पाडणार्‍या कर्मचार्‍या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येईल. यामध्ये शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत. लाठ्या काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement