Advertisement

तोपर्यंत धरू नका धार्मिक पेहरावाचा आग्रह

प्रजापत्र | Thursday, 10/02/2022
बातमी शेअर करा

कर्नाटक-कर्नाटकात न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलंय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसच पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहे. 

 

मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा होणार आहे.  हिजाबवरून झालेल्या वादामुळे कर्नाटकातील सर्व  शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. हायकोर्टाने म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करावीत. तसेच पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी कोणतेही धार्मिक पोशाख घालू नये. राज्यात शांतता राखली पाहिजे.

 

या अगोदर गुरूवारी सकाळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस रितु राज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली जस्टिस कृष्ण एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांना सहभागी करत हायकोर्टाने फुल बेंत म्हणजे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ गठित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सुप्रिम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाची सध्या वाट पाहत आहे.

Advertisement

Advertisement