Advertisement

ही माणसाची नव्हे वानराची अंत्ययात्रा

प्रजापत्र | Monday, 07/02/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-अंबाजोगाईतील खडकपुरा येथे वानराचा सोमवारी (दि.७) सकाळी करंट लागून मृत्यु झाला.हे समजताच नगरसेवक अमोल लोमटे,हनुमंत तौर,सुधाकर भोसले,नरसिंग लोमटे,अनिल व्यवहारे,व नागरिकांनी या मृत वानराचा विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.ही बातमी खडकपुरा गल्लीत वाऱ्यासारखी पसरली असता नागरिकांनी या ठिकाणी वानराचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. या ठिकाणी खडकपुरा येथील भजनी मंडळानी अंत्यविधीची तयारी होईपर्यंत भजन केले.महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढल्या.यावेळी शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता. 

 

          वानरराजाची पालखी द्वारे अंत्ययात्रा खडकपुरा, केशवनगर, देशपांडे गल्ली ते काळा मारुती मंदिर खडकपुरा अशी वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात यावेळी प्रचंड जनसमुदाय या अंत्ययात्रेत सामील झाला होता.काळा मारुती मंदिराच्या पायऱ्याच्या बाजूस या वानरराजाची समाधी बांधून त्यावर तुळस लावून विधिवत या वानरराजास अखेरचा निरोप मोठ्या प्रमाणात जमलेल्या जनसमुदायानी दिला.
एखाद्या नेत्याच्या अंत्ययात्रेला असेल इतका मोठ्या प्रमाणात जनसमुदाय वानराच्या अंत्ययात्रेस होता. माणसातील माणुसकी संपत चालली असताना खडकपूरा येथील महिला, पुरुष, लहान मुले-मुली ही बातमी समजताच जसे जवळचा कोणी मृत झाला आहे. तसे या मुक्या वानरासाठी हातातील सर्व कामे टाकून या ठिकाणी अंत्ययात्रा होईपर्यंत उपस्थित होती. यामुळे माणुसकी लोप पावत चालली असली तरी खडकपुरा येथील नागरिकांत माणुसकी अजून जिवंत असल्याचे दिसून आले.

Advertisement

Advertisement