बीड दि.7 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 708 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 41 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 667 जण निगेटिव्ह आहेत.
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-10, आष्टी-7, धारुर-3, गेवराई-2, केज-2, माजलगाव-1, परळी-9, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आज आठ तालुक्यात केवळ 41 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 149, शुक्रवारी 116, शनिवारी 115, रविवारी 48 तर आज 41 बाधित आढळले आहेत. आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 10 रुग्ण आढळले आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या रविवारच्या नोंदीनूसार 177 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2858 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 723 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 4.01 टक्के, रिकव्हरी रेट 96.68 तर डेथ रेट 2.64 आहे